जळगाव : शक्ती पेपर मिलला आग; सुदैवाने जीवित हानी नाही

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव : येथील सुनासगाव शिवारातील शक्ती पेपर मिलला शुक्रवारी (दि.६) सकाळी साडे अकराच्या सुमारास आग लागली. महापालिकेच्या अग्निशमनदल पथकाने ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
सुनासगाव शिवारातील शक्ती पेपर मिल ही चुडामण सरोदे व शशिकांत वाघूळदे यांच्या मालकीची कंपनी असून शुक्रवारी (दि.६) सकाळी ११.३० च्या सुमारास मिलला भीषण आग लागली. यानंतर जळगाव महापालिकेच्या अग्निशमन दलास ११.४५ मिनिटांनी संपर्क केला असता अग्निशमन दलाचे बंब तत्काळ रवाना करण्यात आले. यावेळी वाहनचालक वसंत न्हावी, भरत बारी, रविंद्र बोरसे, नितीन बारी यांच्या पथकाने दोन बंबाव्दारे आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आणण्यासाठी कंपनी समोरील सुदर्शन पेपर मिलमधून बंबांकरीता पाणीपुरवठा करण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default