नवनीत राणा यांना प्रकृती बिघडल्‍याने लिलावती रुग्णालयात दाखल करणार : वकिलांची माहिती

फुले शाहू आंबेडकर
0
पुढारी : नवनीत राणा पकृती बिघडल्याने मुंबई येथील लिलावती रुग्णालयात दाखल करणार आहे, अशी माहिती आज  त्यांच्या वकिलांनी दिली. राणा दाम्पत्य भायखळा कारागृहातून बाहेर पडले आहेत 
मुंबईतील बोरिवली न्यायालयाने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या सुटकेचा आदेश जारी केला आहे. यामुळे तब्बल १३ दिवस न्‍यायालयीन कोठडीत असणार्‍या राणा दाम्‍पत्‍याला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण (Hanuman Chalisa row) करण्याचा आग्रह धरणे. त्याचबरोबर चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना २३ एप्रिल रोजी अटक केली होती. राणा दाम्पत्याच्‍या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात काल बुधवारी सुनावणी झाली होती. न्यायालयाने राणा दाम्‍पत्‍याला जामीन मंजूर केला आहे. राणा दाम्पत्याला प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटीशर्थींसह जामीन मंजूर केला आहे. त्यांची सुटका करण्याची कायदेशीर प्रक्रिया न्यायालयात पूर्ण झाली आहे.
अचानक नवनीत राणा यांची तब्येत बिघडल्याने मुंबई येथील लिलावती रुग्णालयात दाखल करणार असल्याचे  त्यांच्या वकिलांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default