जालना शहर हादरलं; पतीकडून पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीसह मुलीची हत्या

फुले शाहू आंबेडकर
0

 

कौटुंबिक वादातून पती गणेश सातारे याने पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीसह तिच्या लेकीच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांची निर्घृण हत्या केल्याची क्रूर घटना जालना शहरात घडलीये.

जालना: जालन्यात पतीकडून पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसरी पत्नी आणि अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती आणि पहिल्या पत्नीला अटक केली आहे.
कौटुंबिक वादातून पती गणेश सातारे याने पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीसह तिच्या लेकीच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांची निर्घृण हत्या केल्याची क्रूर घटना जालना शहरातील सोनलनगर भागात घडली आहे. 36 वर्षीय भारती सातारे असं हत्या झालेल्या आईचं नाव आहे.
या दोघी-मायलेकींचे मृतदेह आज सकाळी राहत्या घरात आढळून आले. मृत भारती सातारे यांचे पती गणेश सातारे यांना दोन पत्नी आहेत. कौटुंबिक वादातून या हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मृत महिलेचा पती गणेश सातारेसह त्याच्या पहिल्या पत्नीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default