नाशिक : तरूणींचे अश्लिल फोटो पोर्न वेबसाईटवर टाकल्याने आरोपीला १ वर्षे सश्रम कारावास

फुले शाहू आंबेडकर
0

नाशिक : तरूणींचे विनयभंग करत अश्लिल फोटो पोर्न वेबसाईटवर टाकणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. मुख्य न्यायादंडाधिकारी व्ही. एल. भोसले यांनी शुक्रवारी (दि.६) आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास आणि तीन लाख दंडाची शिक्षा सुनावली आहे. अक्षय श्रीपाद राव (२८, रा. शिवायतन बंगला, खोडे नगर, आठवण हॉटेलजवळ विधाते नगर, इंदिरानगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०१६ ते १२ जून २०१७ या कालावधीत आरोपी अक्षय राव याने पीडित तरूणींचा विश्वास संपादन करून मैत्री केली. त्यानंतर राहत्या घरी बोलावून त्यांना विविस्त्र करून त्यांचेशी शारिरीक अश्लिल चाळे व स्पर्श करून विनयभंग केला. तसेच त्याचे विवस्त्र फोटो काढत पैसे कमविण्यासाठी पार्न वेबसाईड आणि अन्य सोशल साईडवर अपलोड केले. पीडित तरूणींच्या तक्रारींनंतर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता 

तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी तपासाची चक्रे फिरवित आरोपीविरूध्द सबळ पुरावे गोळा केले. तसेच न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मुख्य न्यायादंडाधिकारी व्ही. एल. भोसले यांनी फिर्यादी, साक्षीदार, पंच यांची साक्ष आणि परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपी राव याला १ वर्ष सश्रम कारावास व ३ लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. सुधिर सपकाळे यांनी काम बघितले. कोर्ट अमंलदार म्हणून आर. एच. खकाळे व जी. ए. गायकवाड यांनी पाठपुरावा केला



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default