माझ्या शेजारी बसण्याची तुझी लायकी आहे का? म्हणत चक्क जळत्या लाकडाने केली बेदम मारहाण

फुले शाहू आंबेडकर
0
परभणी : जेवायला माझ्या शेजारी बसण्याची तुझी लायकी आहे का? असं म्हणत जळतानाच्या लाकडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. परभणीच्या सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव इथं हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
अधिक माहितीनुसार, या प्रकरणी राधाकिशन बाबासाहेब लहाने पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधाकिशन बाबासाहेब लहाने असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव इथे शेतामध्ये जेवणाच्या कार्यक्रमास शेळी पालन करणारे सर्जेराव शेषराव हे शेजारी बसल्यामुळे राधाकिशन बाबासाहेब लहाने यांनी शेजारी बसण्याच्या कारणावरून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्या शेजारी बसण्याची तुझी लायकी आहे का? म्हणत जळतानाच्या लाकडाने डाव्या हाताच्या मनगटावर दंडावर मारहाण केल्यामुळे मनगट फँक्चर झाले आहे.
सर्जेराव शेषराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २०९/२०२२ कलम ३२५, ३२३, ५०४, ५०६ भादवी अन्वये राधाकिशन बाबासाहेब लहाने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विठ्ठल राठोड हे पुढील तपास करत आहे. दरम्यान, या घटनेमुळे हल्लीच्या जगात माणुसकी उरली नाही अशाच प्रतिक्रिया समोर येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default