नाशिक : घरात शिरून अडीच लाखांचे दागिने केले लंपास

फुले शाहू आंबेडकर
0
नाशिक : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी घरात शिरून सुमारे अडीच लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी गंगापूर व देवळाली कॅम्प पोलिस
अशोक गणपतराव अवताड (५८, रा. प्रोफेसर कॉलनी, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, दि. २४ एप्रिलला सकाळच्या सुमारास अवताड यांच्या घरात चोरटा शिरला. त्याने घरातील एक लाख ८० हजार १४१ रुपयांचे सुमारे ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व नाणी चोरून नेली. या प्रकरणी गंगापूर पोलिस तपास करीत आहेत. दुसऱ्या घटनेत नानेगाव येथील अनुसया निवृत्ती आडके (६५) यांच्या घरात सोमवारी (दि. २) सकाळी सातच्या सुमारास चोरी झाली. आडके यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने घरात शिरून ९२ हजार रुपये किमतीचे ४१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस तपास करीत आहेत. शहरात चोरी, घरफोडीचे सत्र सुरू असल्याने नागरिकांच्या किमती ऐवजांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुचाकीस्वार चोरटेही सक्रिय झाल्याचे चित्र असून, त्यांच्याकडून महिलांकडील दागिने खेचून नेले जात आहेत. त्यामुळे पोलिस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default