गेल्या काही महिन्यांपासून कोकणे हे अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी कार्यरत आहेत. त्यांनी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत निधीतून केलेल्या कामांची प्रलंबित देयके करण्यासाठी, 30 हजार रुपयांची लाच भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्याकडे मागितली होती. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीचा सापळा रचून बीडच्या पथकाने लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यांना रंगेहाथ पकडले आहे
दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी लाचखोर संजयकुमार कोकणे यांनी, जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहित बंदुकीची मागणी केली होती. गुत्तेदार, कॉन्ट्रॅक्टर बोगस बिलांसाठी चाकू दाखवत धमकी देत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता. आणि त्यामुळेच बंदूक द्यावी अशी मागणी कोकणे यांनी जिल्हाधिकार्यांना केल्याने एकच खळबळ उडाली होती. तर आता बंदुकीची मागणी करणारे खुद्द संजयकुमार कोकणे हे स्वतःहा एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे.
