जळगाव येथे सिम कार्ड बंदचा मॅसेज टाकून डॉक्‍टराची फसवणूक

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव : सिम कार्ड बंद होणार असल्याचे सांगून डॉक्‍टराची फसवणूक झाल्‍याचा प्रकार समोर आला आहे. जळगावातील महावीरनगरातील डॉक्टराची २४ हजार ९०० रूपयात फसवणूक झाली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल करयात आला आहे
जळगाव  शहरातील महावीरनगरातील रहिवासी कुणाल सुरेश चौधरी हे एका खासगी हॉस्पीटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. दरम्‍यान शुक्रवारी (२४ जून) त्यांच्या मोबाईलच्या व्हॉट्सॲपवर सिम कार्ड येत्‍या २४ तासात बंद होणार आहे. त्वरीत खालच्या नंबरवर संपर्क साधा असा संदेश आला. त्यावर त्यांनी संपर्क केला असता त्यांच्या बँक खात्यातून २४ हजार ९०० रूपये ऑनलाईन  ्ध्मी झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default