एकनाथ शिंदे यांच्या गटात जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्वच्य सर्व पाच आमदार आधीच सहभागी झाले आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सर्व आमदार शिंदे गोटात गेल्याने जळगाव महापालिकेत सत्ताधारी शिवसेना गटातील नगरसेवकांमध्ये देखील अस्वस्थता पसरली आहे. राज्यात भाजप व शिंदे गटाची सत्ता येण्यची शक्यता वाढल्यामुळे मनपातील बंडखोर गटातील १५ पेक्षा जास्त नगरसेवकांनी थेट शिंदे गटाला पाठींबा देण्याची तयारी केली आहे. विषेश म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वाखालीच भाजपातील २७ नगरसेवकांनी बाहेर पडून शिवसेनेला मदत केल्याने जळगाव पालिकेत शिवसेनेची सत्ता आली. आता या बंडखोर नगरसेवकांपैकी १५ पेक्षा जास्त नगरसेवक एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यासाठी अंबरनाथला रवाना झाले आहेत.
सुनील चौधरी यांच्या फार्म हाऊसवर
अंबरनाथ येथील माजी नगराध्यक्ष व एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जाणारे सुनील चौधरी यांच्या फार्म हाऊसवर मनपातील बंडखोर नगरसेवक ठाण मांडून आहेत. सर्व नगरसेवकांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. बुधवारी बंडखोर नगरसेवकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेत आपला पाठींबा देखील जाहीर केला आहे.