तुझं लग्न दुसरीकडे कसं होत ते...'; प्रेयसीच्या धमक्यांना कंटाळून वर्ध्यात प्रियकराची आत्महत्या!

फुले शाहू आंबेडकर
0

वर्धा: तुझे लग्न दुसरीकडे कसे होते ते मी बघते... दो लाख रुपये दे... न दिल्यास तुला व तुझ्या कुटुंबीयाला ठार मारेन... तुला पोलीस केस मध्ये फसवीन अशी धमकी प्रेयसी व तिच्या सहकाऱ्याकडून मिळत होती. याच सततच्या जाचाला कंटाळून आशिष नरेश भोपळे (रा. विरुळ आकाजी) याने मांडवा शिवारात असलेल्या नाल्यातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केलीय.

मृतकाने मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीतुन हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मृतकाच्या आई सुनंदा नरेश भोपळेच्या तक्रारीवरुन सावंगी पोलिसांनी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय.

मृत आशिष भोपळे आणि आरोपी पारबता कुंभेकर (रा. कृष्णापूर ता. आर्वी) यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, पारबता ही सहकारी तिलक साटोणे याच्यासोबत मिळून आशिषला नेहमी त्रास द्यायचे. तुझे लग्न कसे होते मी बघतो, अशी धमकी देऊन वारंवार पैशाची मागणी करुन तिने आशिषकडून तब्बल दोन लाख रुपयांची मागणी केली. तर, पैसे देण्यास नकार दिल्यास तुला व तुझ्या कुटुंबियांना जिवे ठार मारुन तुला पोलीस केसमध्ये फसवेल, अशी धमकी देऊ लागले.

त्यामुळे, प्रेयसी आणि तिच्या मित्राच्या सततच्या तगाद्यामुळे हताश आणि निराश झालेल्या आशिष भोपळे याने सावंगी पोलीस स्टेशनं हद्दीतील मांडवा शिवारात एका नाल्यातील झाडाला गळफास घेत आत्महत्या करुन जीवन संपविले. या प्रकरणाची तक्रार दाखल होताच सावंगी पोलिसांनी  गुन्हा दाखल करता तपासाला सुरवात केलीय. या घटनेमुळे मृतकाच्या घरावर दुःखाच डोंगर कोसळलय.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default