पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्‍या जाळ्यात लाखाची लाच स्विकारताना ताब्‍यात

फुले शाहू आंबेडकर
0
मेहुणबारे : फिर्यादीस गुन्ह्यात मदत करून दोषारोप पत्र लवकरात लवकर पाठविण्याच्या मोबदल्यात साडेचार लाखाची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख स्विकारणाऱ्या मेहुणबारे  पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक योगेश ढीकले यास आज दुपारी दोनच्‍या सुमारास पोलीस स्टेशनच्या आवारात एक लाखाची लाच घेतांना रंगेहात पकडल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. 
मेहुणबारे पोलीस स्टेशनचे संशयीत आरोपी योगेश ढिकले एका गुन्ह्यात तपास अधिकारी होते. त्या गुन्ह्यांतील संशयीत आरोपीस गुरुवारी व शनिवारी पोलिस स्टेशनमध्‍ये हजेरी लावण्याचे कोर्टाचे आदेश असुन त्या गुन्ह्याचे दोषारोपत्र व हजरी कामी मदत करण्यासाठी आरोपी ढिकले याने साडेचार लाखाची मागणी केली होती. मात्र तडजोड अंती एक लाख देण्याचे ठरल्याने तक्रारदाराने जळगाव एसीबी  येथे तक्रार केली.

पोलिस स्‍टेशनच्‍या आवारातच पकडले

एसीबीने तक्रारीची पडताळणी करून आज दुपारी 2 वाजता मेहुणबारे पोस्टे सापळा रचुन ढिकले यांना पोस्टेच्या आवारात लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. एसीबीचे पोलिस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. या कार्यवाहीने मेहुणबारे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default