अंबड पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं आहे. सचिन अशोक पवार असं आरोपी पतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन पवार मूळ राहणार खिर्डी ता. खुलदाबाद औरंगाबाद हा पत्नी संगीता सोबत चार दिवसांपूर्वी अंबड चुंचाळे शिवारात राहण्यास आला होता. रविवारी रात्री त्याचे पत्नी संगीतासोबत वाद झाले. त्यानंतर त्याने पत्नीचा गळा चिरून खून केला.
दरम्यान, पत्नीची हत्या करून आरोपी सचिन हा घराला बाहेरून कडी लावून फरार झाला. त्यानंतर पहाटे औरंगाबाद येथील वाळुंज पोलिस स्टेशन मध्ये तो स्वतः हजर झाला. येथील पोलिसांनी अंबड पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा संगीता ही रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविचछेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
