आता नंबर प्लेट हाेणार स्कॅन
सध्या महामार्गावरून प्रवास करताना वाहनावर लावलेल्या फास्टॅगमधून टाेलची आकारणी केली जाते. नवीन तंत्रज्ञान लागू झाल्यानंतर तुमच्या वाहनाची नंबर प्लेट स्कॅन केली जाईल आणि फास्टॅगमधून पैशांची आकारणी हाेईल. यामध्ये किलोमीटरच्या आधारे आकारणी हाेणार असल्याचे मानले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, टोलवर एकाच वेळी पैसे वसूल केले जात होते. मात्र नवीन प्रणालीनूसार महामार्गावर एकच एंट्री (प्रवेश) आणि एक्झिट (बाहेर) पॉइंट असेल. वाहन दाखल होताच नंबर प्लेट स्कॅन हाेईल. त्यानंतर प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या अंतरानुसार प्रवाशांच्या खात्यातून पैसे कापले जातील.
राजस्थानपासून सुरुवात होईल
या संकल्पनेची सुरुवात राजस्थानपासून होत आहे. भारत माला प्रकल्पांतर्गत राजस्थानमध्ये ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे बनवला जात आहे. प्राप्त माहितीनुसार, राजस्थानमध्ये त्याची एकूण लांबी 637 किलाे मीटर असेल. हा एक्स्प्रेस वे पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमधून जाणार आहे. त्याची लांबी 1224 किलाे मीटर असेल. हा ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे पंजाबमधील अमृतसर ते गुजरातमधील जामनगरपर्यंत सुरू होईल. ते राजस्थान या दोन शहरांना जोडेल. या NH वरून अरबी समुद्रातील बंदरापर्यंत कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राजस्थानला एक समर्पित एक्सप्रेस वे मिळेल.
