पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या दंडे हिचा घटस्फोट झाला होता. ती गंगापूर येथे आई-वडिलांकडेच राहून ब्युटी पार्लरचा व्यवसाय करत होती. तिचे एका मुलावर जीवापाड प्रेम होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्या प्रियकरचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून दिव्या मानसिक तणावात होती. त्यानंतर ९ जूनपासून ती अचानक बेपत्ता झाली. दिव्या बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांकडून देण्यात आली होती.
नातेवाईकांकडून तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर कायगाव येथील गोदावरी नदीत मासेमारी करणाऱ्या व्यक्तींना एका तरुणीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह नदीतून बाहेर काढला आणि मिसिंग रिपोर्टवरून दिव्यांची ओळख पटवीत तिच्या नातलगांना बोलावून घेतले.
