राज्यात सुरू असलेले राजकारण हे न समजणारे आहे. शिवसेनेचेच आमदार शिवसेनेतून फुटून बाहेर पडले आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थीर झाले आहे. या सर्व प्रकारावर राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी सांगितले, की एकीकडे शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण त्यांच्याबरोबरच असल्याचे दाखवत गोहाटीकडे पलायन करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनापासून राजकारण होत नसून खिशापासून हे राजकारण केले जात असल्याचा आरोप देखील गोटे यांनी लावला आहे.
सरकार वाचावे यासाठी आघाडीतील नेत्यांचे प्रयत्नच नाही; अनिल गोटे यांचा घणाघाती आरोप
शनिवार, जून २५, २०२२
0
धुळे : मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर आता या प्रकरणावर धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यात गोटे यांनी सर्रासपणे महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांवर आरोप लावत कुठल्याही नेत्याने हे सरकार वाचविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली नसल्याचे म्हटले आहे.
Tags
