तळोद्यात पाच वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती. वादळी वाऱ्याचा जोर इतका होता की, रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली. दुचाकीवरून भवरकडून खर्डी नदी मार्गे तळोदाकडे येणाऱ्या रवींद्र गुलाब ठाकरे वय ४०, रा. कळमसर मोहिदा हा तरुण कामे आटपून तळोदाकडे येत होता. या दरम्यान अचानक त्याच्या दुचाकीवर झाड कोसळले. या घटनेत चालक झाडाखाली अडकून पडला होता.
नागरीकांच्या मदतीतून वाचले प्राण
दरम्यान झाड कोसळल्याचा आवाज झाल्याने परिसरात एकच घबराट पसरली. रस्त्यावर जाणारे प्रवासी व जवळच असलेले धाणकावाडा येथील नागरिकांनी धावपळ केली. झाडाखाली सापडलेले दुचाकीवरून त्या तरुणास बाजूला काढले व त्यास रुग्णवाहिकेला प्राचारण करून तात्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले.
