पत्नीचा सामूहिक आत्महत्येला नकार पतीने घेतला गळफास

फुले शाहू आंबेडकर
0
औरंगाबाद : प्रेमविवाह केल्या नंतर आर्थिक अडचणींचा सामना दाम्पत्य करीत होता. मात्र काही केल्या घरची परिस्थिती सुधारत नसल्याने आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आता आत्महत्या हा एकच पर्याय आहे, असे तो नेहमीच पत्नीला सांगायचा. ती मात्र त्याला हेही दिवस जातील असे समजावून धीर द्यायची. मात्र अखेर त्याने आत्महत्या केलीच अन एका दु:खद प्रेमकहाणीचा अंत झाला. ही दुर्दैवी घटना संजयनगरात रविवारी घडली. शुभम केशवराव घुगे (रा.लिंबाळा ता. जिंतूर जि. परभणी. ह.मु संजयनगर गल्ली क्र-३) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मूळचा जिंतूर तालुक्यातील असलेला शुभम हा पुण्याला नोकरी करीत होता. तिथेच त्याची शुभांगीशी ओळख झाली. २०१७ साली त्यांनी आर्यसमाज पद्धतीने प्रेमविवाह केला. कुटुंबाच्या मर्जीविरुद्ध प्रेम विवाह केल्याने त्यांनी पुणे सोडले अन औरंगाबादेत आले. गेल्या तीन वर्षांपासून ते शहरातील संजयनगर गल्ली क्र-३ मध्ये भाड्याने रूम घेऊन राहत होते.
पुढे कोरोना काळात त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. त्यानंतरही शुभमला नोकरी मिळाली नाही. मित्रांकडून पैसे घेऊन तो कसेबसे घराचा गाडा हाकत होता. या काळात शुभम निराशेच्या गर्तेत गेला. शुभांगी मात्र त्याला धीर देत होती. कर्जाच्या वाढत्या तणावाने तो सिगरेट आणि दारूच्या आहारी गेला. वाढत्या कर्जाने शुभम तणावाखाली राहत होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default