गद्दारांचे करायचे काय खाली डोके वर पाय' शिवसैनिकांनी शिंदेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन

फुले शाहू आंबेडकर
0
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलने छेडण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दीपक गवते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. रनाळे येथील बाजार चौकात रविवारी सायंकाळी संतप्त झालेल्या शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या धिक्कार करीत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी ' गद्दारांचे करायचे काय खाली डोके वरती पाय', 'धिक्कार असो धिक्कार असो एकनाथ शिंदे यांच्या धिक्कार असो', 'जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद' अशा जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
आंदोलनात माजी नगरसेवक सुनील सोनार, शेतकरी सहकारी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे, गोकुळ नागरे पंडित नागरे संतोष पाटील योगेश सानप,पंकज नागरे, बबलू नागरे,केशव आव्हाड, साहेब घुगे, सलीम मिर्झा,जाकीर खाटीक, अनिल गोसावी,मोहन धनगर, दीपक गीते,विनोद पाटील, वामन गाभणे, सुनील पाटील,हर्षल नागरे,अमित गवते, बापू गवते,प्रकाश धात्रक यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.
शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा केली जाणार नाही. बंडखोर एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत असलेल्यांना शिवसैनिक घरी पाठवल्या शिवाय स्वस्त बसणार नाहीत. रिक्षाचालका पासून ते मंत्री पदापर्यंत शिवसेनेने एकनाथ शिंदेंना मोठं केलं परंतु, ते आता शिवसेनेशी गद्दारी करीत आहे. त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माफ करणार अशी संतप्त भावना जिल्हा समन्वयक दीपक गवते यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default