भडगाव तालुक्यातील देव्हारी या गावी मंगळवारी लग्न होते. त्यानिमित्ताने सोमवारी रात्री हळदीचा कार्यक्रम सुरू असतांनाच गावातील संशयित अनिल सोनवणे, सुखदेव उर्फ अप्पा देवाराम सोनवणे, समाधान सोनवणे, दिलीप गायकवाड आणि योगेश सोनवणे यांच्यासह अनोळखी ३० महिला आणिव पुरुषांचा जमाव हळदीच्या मंडपात घुसला. त्यांनी वधूला जातीबाबत विचारणा केली. त्यानंतर मिळालेल्या उत्तराने संतप्त होत जमावाने हळद लागलेल्या वधू-वरावर हल्ला चढवला. सर्व हल्लेखोर हे वराचे नातेवाईक असल्याची चर्चा आहे.
नवरदेव गंभीर जखमी
जमावामधील अनिल सोनवणे याने चॉपरने नवरदेवाच्या गळ्यावर वार केला. यात नवरदेव गंभीर जखमी झाला. मंडप, घरातील सर्व साहित्याचीही जमावाकडून तोडफोड करण्यात आली. हा गोंधळ सुरू असतानाच तेथे भडगाव पोलीस पोहोचले.

पोलिसांच्या वाहनावरही दगडफेक
घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्न केला. तेव्हा जमावाने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करुन वाहनाच्या काचा फोडल्या. या प्रकरणी वधूच्या फिर्यादीवरुन भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

दरम्यान, हल्ल्यात वर गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या वधू-वराचे आज होणारे लग्न स्थगित करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.