नाशिक | प्रतिनिधी:एकीकडे शिवसेनेत उभे खिंडार पडले असतानाच आता खासदार आणि नगरसेवकदेखील शिंदे गटात सामील होण्याची जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. नाशिक लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत गोडसे कुठे आहेत? तेही या बंडात सामील आहेत का? असे अनेक प्रश्न नाशिककरांना पडलेले होते....
या बैठकीला खासदार या नात्याने तसेच निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आपण हजर राहणार आहोत. शिंदे गटात सामील होणे किंवा बंड करणे असे काहीही आपण करणार नसल्याचे सांगत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे पक्षप्रेम, कार्यकर्ता, निष्ठा कशी असावी यावर त्यांनी सांगितले.
राज्यातील बंडाबाबत बोलताना ते म्हणाले की, मी स्वत: उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. बाकीच्या विषयावर मी काही बोलू शकत नाही. यावरुन सेनेच्या बालेकिल्ल्यातील खासदार हेमंत गोडसे सध्यातरी रिचेबल असून ते कुठेही जाण्याच्या तयारीत दिसत नाहीयेत.
