पैशांचा पाऊस पाडण्यासाठी घेतले 11 लाख, हॉटेलमध्येच मांडली पूजा, पण पोलिसांची झाली एंट्री

फुले शाहू आंबेडकर
0
पैशांचा पाऊस पाडतो म्हणून पूजेसाठी 11 लाख 62 हजार रुपये घेऊन फसवणाऱ्या तीन भोंदूंना गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुख्य बस स्थानक जवळील हॉटेलमध्ये पैश्यांचा पाऊस पाडण्यासाठी आले असताना गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास साळुंके, प्रमोद कांबळे आणि गोरख पवार अशी या आरोपींची नावे आहेत. तर यातील आरोपी रवींद्र हुंडे फरार आहे. तर जावेद खान नूर खान, पुष्पा बाळगो आणि शोधक निपानकर अशी फसवणूक झालेल्या तक्रारदारांची नाव आहेत.
जावेद खान नुर खान पडेगाव येथे रहिवासी आहेत. त्यांचा आधी ढाबा चालवण्याचा व्यवसाय होता. त्या माध्यमातून अनेकांशी त्यांची ओळख असायची. पुष्पा बाळगो ही त्यांची मानलेली बहीण असून ती गोव्यात स्थायिक आहे. पुष्पा या जावेद यांच्या घरी आल्या असताना दीपक प्रमोद कांबळे यांनी पैशाचा पाऊस पाडणारा मांत्रिक ओळखीचा असल्याचं सांगितलं. त्यामध्यामातून कैलास साळुंके, प्रमोद कांबळे आणि गोरख पवार यांची ओळख झाली.
पूजा करून आपण पैशांची पाऊस पाडू शकतो असा विश्वास दिला. त्यासाठी एकदा शिर्डीला नेत आपण पाऊस पाडू शकतो हा विश्वास दिला. त्यासाठी पूजा करावी लागलं अस सांगत सात हजार रुपये देखील घेतले. विश्वास बसल्याने जावेद खान यांनी 2 लाख, पुष्पा यांनी ५ लाख ९० हजार तर परिचित असलेले शोधक निपनिकर यांनी २ लाख रुपये दिले. पूजा मांडण्याचं नाटक केलं. मात्र पाऊस पाडण्यात आला नाही.
शुक्रवारी दुपारी मुख्य बस स्थानकाजवळ हॉटेल येथे पाऊस पडणार असल्याचं पोलिसांना कळलं त्यावरून गुन्हे शाखेने धाड टाकून डाव उधळून लावला. जावेद खान यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे शाखा पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default