गेल्या पंधरा दिवसांपासून मतदार संघातून आमदार चिमणराव पाटील हे शिंदे गटाबरोबर होते. विधान परिषदेची निवडणूक संपताच ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पहिल्या दिवसापासून होते. ते आज आपल्या मतदारसंघात आले असता आपल्या पारोळा मतदार संघातील आपल्या मतदारांशी त्यांनी संवाद साधला.
तीस वर्ष ज्यांच्याशी संघर्ष त्यांच्याबरोबर बसणे न पटणारे
आमदार पाटील म्हणाले, की आपण कुठल्याही पदाच्या किंवा सत्तेच्या लालसेपोटी शिंदे गटाबरोबर गेलो नव्हतो. तर पक्षाचा अजेंडा हा हिंदुत्व या मुद्द्यावर आहे. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेला उठाव व त्याबरोबर जाणे मी योग्य समजतो. यावेळी त्यांनी खंत व्यक्त करताना सांगितले, की गेल्या 30 वर्षापासून ज्यांच्याशी संघर्ष केला. त्यांच्याबरोबर बसून राजकारण हे मनाला पटत नव्हते. या विषयाला अनुसरून शिंदे गटात 40 आमदार सहभागी झाले ते एकच विचाराणे हिंदुत्व आणि समान वागणूकीने.
