हृदयद्रावक! वीज कोसळून चार शेतकरी महिलांचा मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

फुले शाहू आंबेडकर
0
चंद्रपूर : जिल्ह्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. वरोरा तालुक्यातील शेगाव येथे वीज कोसळून चार शेतकरी महिलांचा  दुर्देवी मृत्यू झाला आहे. आज दुपारच्या सुमारास शेतात काम करत असताना या महिलांवर काळाने घाला घातला. वीज कोसळून  शेतकरी महिलांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. हिरावती शालिक झाडे (४५), पार्वता रमेश झाडे (६०),मधुमती सुरेश झाडे(२०), रीना नामदेव गजभे वय (२०) अशी मृतांची नावं आहेत. या दुर्देवी घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे 
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरच्या  वरोरा तालुक्यात शेगावमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. वीज कोसळून चार शेतकरी महिलांचा मृत्यू झाल्याने परिसर शोकाकूल झाले आहे. आज दुपारच्या सुमारास शेतात काम करत असताना शेतकरी महिलांना मृत्यूनं गाठलं. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर पसरला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default