भयंकर! दारु पिण्यासाठी पाणी दिलं नाही, तरुणावर केले धारधार शस्त्राने वार, आरोपी गजाआड

फुले शाहू आंबेडकर
0
उल्हासनगर : येथील गोल मैदानात धक्कादायक घटना घडली आहे. दारु पिण्यासाठी पाणी दिलं नाही म्हणून एका व्यक्तीवर धारधार शस्त्राने वार केल्याची घटना घडलीय. राजू जोगदंडे असं गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. जोगदंडे यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना उल्हासनगरच्या गोल मैदानात घडली असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी गोकुळला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू शुक्रवारी रात्री गोलमैदान परिसरात दारू पिण्यासाठी बसला होता. त्याठिकाणी त्याचा ओळखीचा गोकुळ नावाचा तरुण आला. गोकुळने राजूकडे दारु पिण्यासाठी पाणी मागितलं. परंतु राजूने पाणी देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर गोकुळने राजूवर धारधार शस्त्राने वार केले.
या हल्ल्यात राजू गंभीर जखमी झाला. याप्रकरणी आरोपी गोकुळला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, उल्हासनगरच्या गोलमैदान परिसरात नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी रात्रीच्या वेळी गस्त घालून गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालावा, अशी मागणी नागरिक करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default