मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पंचवटी परिसरातील गौरी भावसारचा तीन महिन्यापूर्वीच भद्रकाली परिसरातील मयूर भावसार या मुलासोबत प्रेमविवाह झाला होता. मात्र, शनिवारी रात्री सासरी पंख्याला गळफास घेत गौरीने आत्महत्या केली आहे. गौरीच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. गौरीच्या कुटुंबीयांकडून तिला सासरच्या मंडळीकडून त्रास दिला गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे गौरीच्या कुटुंबीयांकडून सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. सासरच्यांना अटक न केल्यास अंत्यविधी करणार नाही, अशी आक्रमक भूमिका गौरीच्या माहेरच्या लोकांनी घेतली.
लग्नाच्या तीन महिन्यांनी विवाहित महिलेने संपवले जीवन; नाशिकमधील धक्कादायक घटना
सोमवार, ऑगस्ट ०१, २०२२
0
नाशिक : नाशिक शहरातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये विवाहित महिलेने धक्कादायक पाऊल उचललं आहे. तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या एका १८ वर्षीय विवाहित महिले राहत्या घरी आत्महत्या केली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून तिने हे कृत्य केल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Tags
