लखाळे येथील निर्मला गणेश चव्हाण (वय ३५) असे तिचे नाव आहे. तिचा गणेश एकनाथ चव्हाण (वय २९, रा. ताहाराबाद, ता. बागलाण, जि.नाशिक याच्याशी प्रेमविवाह झाला असून, त्यांना चार अपत्ये आहेत. दरम्यान १२ जुलैला रात्री निर्मलाने जेवण बनविले नाही. त्याचा राग येऊन गणेशने पत्नी निर्मलाशी भांडण केले.
वादात लाकडी दांडक्याने मारहाण
यादरम्यान रात्री साडेआठला गावातील जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारतीच्या ओट्यावर लाकडी दांडक्याने निर्मलाच्या तोंडावर व डोक्यावर मारहाण करीत तिचा खून केला. याबाबत सुरमल मंगळ्या पवार (वय ६२, रा. लखाळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिस ठाण्यात गणेश चव्हाण याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला.
