धुळ्याचे माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार त्याचबरोबर माजी कृषी मंत्री दादा भुस यांच्या उपस्थितीत मनोज मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला रामराम ठोकत शिंदे गटात सहभागी होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे.
यापुर्वी जिल्हा प्रमुखही शिंदे गटात
एकनाथ शिंदे हे 40 आमदारांसह गोवाहाटी येथे पोहोचले. त्यावेळी धुळे जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख तुळशीराम गावित यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन देत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्या पाठोपाठ आता धुळ्याचे महानगर प्रमुख मनोज मोरे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळे धुळ्यात उद्धव ठाकरे समर्थक शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचे बघावस मिळत आहे.
