धुळ्याकडून शिरपूरकडे भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने सदर वाहनाला उजव्या बाजूने धडक दिली. या अपघातात दहा ते पंधरा वऱ्हाडी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने सोनगीर टोल येथील रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघात झाल्याचे लक्षात येताच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी व परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत बचाव कार्य करण्यास मदत केली आहे.
वऱ्हाड्यांच्या गाडीचा अपघात पंधरा जण जखमी
शुक्रवार, जुलै ०८, २०२२
0
धुळे तालुक्यातील वडेल येथून कंचनपूर येथे लग्नासाठी वऱ्हाड घेऊन निघालेल्या आयशर गाडीला धुळे ते शिरपूर महामार्गावर तिसगाव ढंडाने फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात दहा ते पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पुरुषांसह महिला व बालकांचा देखील समावेश आहे
Tags
