जळगावमधील हरिविठ्ठलनगरातील धीरज शिवाजी काळे (वय २१) असे मयत तरूणाचे नाव आहे. धीरज काळे हा आई– वडील आणि भाऊ यांच्यासह वास्तव्याला होता. भाऊ व वडीलांसोबत फर्निचरचे काम करून उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी (१४ जुलै) धीरज हा वडील शिवाजी श्रावण काळे यांच्यासोबत अनुराग स्टेट बँक कॉलनी फर्निचरच्या कामाला गेला होता. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वडीलांचे लक्ष नसतांना एका खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीला आला.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
रामानंदनगर पोलीस ठाण्याचे हवालदार सुनील पाटील व हरिश डोईफोळे यांनी घटनास्थळी गेले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीसांनी त्याचा मोबाईल जप्त केला आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात वडील शिवाजी श्रावण काळे, आई संगीता, भाऊ संदीप, मंगेश व विवाहित बहिण असा परिवार आहे.
