कल्याण- डोंबिवली : आपण ज्वेलर्सचे नवं दुकान उघडणार असल्याचं सांगून एका भामट्यानं डोंबिवलीतल्या आपल्याच ज्वेलर्स मित्राकडून 35 लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला होता. डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी या प्रकरणी त्या भामट्याला अटक करून त्याच्याकडून 400 ग्रॅम वजनाचे 35 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. त्या भामट्याचं नाव विश्वनाथ जगताप असं आहे.
विश्वनाथ जगताप अस या भामट्यांचं नाव आहे. डोंबिवली पूर्वेत राहणारे अजय जैन यांचे ज्वेलर्स दुकान आहे. याच परिसरात राहणारा विश्वनाथ जगताप यांचा जैन यांच्याशी परिचय होता. याचा फायदा घेत विश्वनाथ याने आपल्याला नवीन ज्वेलर्स चे दुकान सुरू करायचं आहे असे सांगत जैन यांच्याकडून 35 लाख रुपयांचे जवळपास 700 ग्राम वजनाचे दागिने घेतले होते. मात्र बरेच दिवस उलटले तरी विश्वनाथ दागिने परत देत नव्हता काही दिवसांनी विश्वनाथ पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अजय जैन यांनी या प्रकरणी राम नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.
तपासादरम्यान विश्वनाथ पुण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे रामनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने पुणे येथे जाऊन आरोपीला अटक करत आरोपीकडून चोरी केलेले 35 लाख किंमतीचे 700 ग्राम वजनाचे दागिने देखील हस्तगत केले. अशी माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्याकडून देण्यात आली आहे.
