धुळे येथे 74 हजार मालमत्तांवर फडकेल तिरंगा

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत महापालिका क्षेत्रातील ७३ हजार ९४२ मालमत्तांवर तिरंगा फडकविण्याचा निर्धार महापौर प्रदीप कर्पे यांनी महासभेतून व्यक्त केला. शहरातील या स्थितीचे ड्रोनद्वारे चित्रीकरणही होईल. या निर्णयास नगरसेवक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आझादी का अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा उपक्रम राबविला जाणार आहे. यानुसार महापालिकेतर्फे १२ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हा महोत्सव साजरा होईल. देशभक्तिसाठी प्रेरित या एकाच विषयासाठी राज्यात अशी महासभा घेणारी धुळे महापालिका पहिली ठरल्याचे भाजपचे महापौर प्रदीप कर्पे यांनी सांगितले. महासभेत बुधवारी (ता. ३) या विषयावर सविस्तर चर्चा व नियोजन झाले. महापौरांसह आयुक्त देविदास टेकाळे, उपमहापौर अनिल नागमोते, नगरसचिव मनोज वाघ व्यासपीठावर होते. नगरसेवक हर्शकुमार रेलन, प्रतिभा चौधरी, नागसेन बोरसे, किरण अहिरराव, सारिका अग्रवाल आदींच्या पत्रानुसार महासभा झाली. नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. याअनुषंगाने महासभेत अनेक निर्णय झाले. मोफत वाटपासाठी पुढाकार महापालिकेतर्फे एका तिरंगा ध्वजाची विक्री केली तर ३२ रुपये आकारणी झाली असती. मात्र, धुळेकरांना मोफत ध्वज वितरित होण्यासाठी नगरसेवकांनी महिन्याचे प्रत्येकी पाच हजार मानधन, तर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका दिवसाचे वेतन देण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला. शिवाय नगरसेवक नागसेन बोरसे वैयक्तीक ११ हजार रुपये, तर वंदना भामरे, मुक्तार मन्सूरी, संतोष खताळ, शेख करीम, सद्दाम हुसेन आदींनी प्रत्येकी पाच हजारांची रोख रक्कम महासभेत सुपूर्द केली. धुळेकरांना महापालिका, कमलाबाई शाळा चौक, जयहिंद महाविद्यालय, एसएसव्हीपीएस महाविद्यालय, लोकमान्य हॉस्पिटल आदी ठिकाणी तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप केले जाईल. प्रभाग क्रमांक १७ चे नगरसेवक तथा स्थायी सभापती शीतल नवले, सुरेखा उगले यांच्या पुढाकाराने साडेपाच हजार घरांवर तिरंगा फडकविण्याच्या खर्चाचा भार उचलल्याची माहिती महासभेत देण्यात आली
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default