फवारणी करतांना विषबाधा; शेतकरी तरुणाचा मृत्यू

फुले शाहू आंबेडकर
0
पाचोरा (जळगाव) : वरखेडी (ता. पाचोरा) येथील 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याला शेतातील पिकावर फवारणी करताना विषबाधा झाली. यात त्‍याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घरातील कर्ता तरुण गेल्याने  भोई कुटुंबीय कमालीचे खचले आहे
वरखेडी  येथील अविनाश भोई असे मयत तरूण शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्याकडे एक एकर जमीन आहे. वरखेडी शिवारातील आपल्या शेतातील पिकांवर 30 जुलैला किटक नाशकाची फवारणी करत असताना त्यांना भुरळ येऊन त्यांची शुद्ध हरपली. त्यांना तात्काळ पाचोरा येथे खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मृत्यूशी झुंज देत असतानाच 1 ऑगस्‍टला सायंकाळी त्यांना मृत्यू ओढवला.

घरातील कर्ता गेला

घरातील कर्ता तरूण गेल्याने भोई कुटुंबीय कमालीचे खचले आहेत. आाता घरात कमावता पुरूष राहिलेला नाही. मयत अविनाश भोई यांच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. पाचोरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default