मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात नशेच्या गोळ्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या धक्कादायक प्रकाराला रोखण्यासाठी पोलिसांकडून एनडीपीएस पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पोलिसांनी डॉक्टरच्या वेश धारून करून नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या आरोपींच्या मुस्क्या आवळल्या
दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी त्यांचे नाव शेख नय्यर शेख नईम आणि शेख रहीम शेख मेहबूब असल्याचे सांगितले. पोलिसांनी सदर आरोपींकडे झाडाझडती केली असता ७६नशेच्या गोळ्या,मोबाईल, रोख रक्कम, दुचाकी वाहन असा एकूण एक लाख ३४५२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
