तो एमबीए झाला, पण बनला भामटा; बनावट आयकर अधिकारी बनून सराफा व्यापाऱ्यांना लावला चुना

फुले शाहू आंबेडकर
0
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात जानेवारी महिन्यात सराफा व्यापाऱ्याला दोन लाखांनी गंडविणारा बनावट आयकर अधिकाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. देशभर हा भामटा बनावट आयकर अधिकारी बनून सराफा व्यावसायिकां दबावाने दोन लाखांपर्यंत दागिने खरेदी करत ऑनलाइन पद्धतीने फसवत असे. विशाल निलंगे असे या भामट्याचे नाव असून कर्नाटकातील बिदरचा आहे रहिवासी. विशेष म्हणजे त्यांचे शिक्षण एमबीए इतके झाले आहे. विमान, रेल्वे आणि लक्झरी गाड्यांनी देशभर प्रवास करत सराफा व्यावसायिकांना फसविण्याचा त्याचा होता धंदा, बंगळुरू पोलिसांनी त्याला अटक करून बल्लारपूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
देशभर विशाल निलंगे हा २७ वर्षीय भामटा महागड्या लक्झरी गाड्या, विमान व रेल्वे प्रवास करत सराफा व्यावसायिकांकडे आयकर अधिकारी म्हणून पोहचायचा. सराफांना विविध प्रश्नांनी भंडावून सोडत त्यांना हळूच दोन लाखांपर्यंतचे दागिने खरेदी करण्याची ऑफर द्यायचा. दागिने खरेदी करत ऑनलाइन पैसे देत एखादा जुना पेमेंट स्क्रीनशॉट दाखवून लगेच पसार व्हायचा.
आपले सिम व मोबाईल तो देखील फेकून देत असल्याने याला पकडणे अशक्य झाले होते. जानेवारी महिन्यातील बल्लारपूर शहरातल्या घटनेनंतर पोलिसांनी देशभर या इसमाचा तपास चालविला होता. दरम्यान, मूळ कर्नाटक राज्यातील बिदरचा रहिवासी असलेला विशाल याने दिल्ली -झारखंड- ओडिशा- कर्नाटकचे अनेक जिल्हे व महाराष्ट्रात सराफा व्यावसायिकांना असाच चूना लावल्याचे कबूल केले आहे.
बल्लारपूर शहरातील खंडेलवाल ज्वेलर्स च्या तक्रारीनंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असताना बंगळुरू पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान सध्या हा भामटा बल्लारपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. राज्यात अन्यत्र सराफा व्यावसायिकांची झालेली फसवणूक आता पुढे येणार असून बल्लारपूर पोलीस लुटीचे दागिने हस्तगत करण्यासाठी कारवाई करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default