घरकुल योजनेत कमी काम; दोन ग्रामसेवक निलंबित

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव : पंचायत समिती धरणगाव येथे गुरुवार  कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आढावा सभा घेतली. यात स्वछ भारत मिशन आणि घरकुल योजनेत कमी काम आढळून आलेल्या बोरगाव व वाघळूद येथील ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
धरणगाव येथे जळगाव जिल्‍हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते. या आढावा सभेत उपस्थित झालेले मुद्दे व दप्तरात आढळून आलेल्या दिरंगाईमुळे आर. डी. पवार व बी. डी. बागुल या दोघा ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

१७ ग्रामपंचायतींची सखोल तपासणीचे आदेश

धरणगाव तालुक्यातील नांदेड, जाबोरे, रेल, सोनवद, चालखेडा, दोनगाव, वराड येथील येथील ग्रामपंचायत दप्तराची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जळगाव तालुक्यातील उमाळे, पाथरी, शेळगाव, कुसुबा, वावडडे, वडली, सुभाषवाडी, जवखेडे, वराड, बेडी येथील ग्रामपंचायत दप्तराची सखोल तपासणी करण्याचे आदेश देखील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default