शिवाजीनगरातील उमर कॉलनीतील बरकते मस्जिद जवळील रहिवासी इमरान खान अकबर खान वय-३८ हा कपडे विक्रेता गुरुवारपासून घरातून निघून गेला होता, रात्री उशिरा घरी परतला तेव्हा त्याकडे विक्रीसाठी नेलेले कपडे नव्हते, खाली हाती आला होता. खूप भयभयीत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
शुक्रवारी सकाळी तो पत्नीला कपडे परत घेऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडला, यानंतर शनिवारी सकाळी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर एका गॅरेजच्या शेडमध्ये कपड्याच्या साहाय्याने निवस्त्र अवस्थेत गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा दावा केला आहे. तर नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
