आरोपी पत्नी कराटे प्लेयर? :
या घटनेत आरोपी पत्नी ही कराटे प्लेयर असून मृतक हा आधी होमगार्ड मध्ये कार्यरत होता. दोन वर्षांपूर्वी आंदोलनादरम्यान तो निलंबित झाला होता. त्यानंतर तो रोज मजुरी करायचा आणि तो दारू पिण्याचे सवयीचा होता.. म्हाताऱ्या सासऱ्याने बॅगमध्ये काय आहे? असे विचारले असता जुने कपडे जाळायला आणले असे मनीषाने सांगितले. पुलगाव पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला असून मृतकाची पत्नी मनीषा व मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनेचा संपूर्ण तपास, आरोपींची चौकशी झाल्यानंतर हत्या का केली याचा उलगडा होईल..
मृतदेहाचे अवशेष पाठवले फॉरेन्सिकला :
आज 9 ऑगस्ट रोजी पोलिसांनी मृतकाच्या शरीराचे अवशेष ताब्यात घेऊन फॉरेन्सिक लॅब कडे पाठवले. या हत्याकांडाने जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली असून इतक्या क्रूरपणे हत्या झाल्याने एकप्रकारे आश्चर्य व्यक्त होत आहे. उपविभागीय अधिकारी गोकुळसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक शैलेश शेळके राजू हाडके खुशाल पंत राठोड संजय पटले पंकज टाकोने महादेव सानप, शरद सानप पुढील तपास करत आहेत.
