आधी एकत्र जेवण केले, मग हॉटेलच्या रुममध्ये नेऊन पोलिसाने आपल्यावर बलात्कार केला, असा आरोप पीडितेने केला आहे. पीडित महिलेने कनाकिया पोलिस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली, त्यानंतर कनाकिया पोलिस स्टेशनच्या पोलीस उपायुक्तांनी चौकशी सुरू केली आहे.
काय आहे प्रकरण?
10 ऑगस्ट रोजी ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. एमएचबी पोलिसांना त्यांच्या कार्यक्षेत्रात वेश्या व्यवसायाचे रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली होती. छापा टाकण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहकाला पाठवले. परंतु यात कुठलाही दलाल सहभागी नसल्याने छापा व्यर्थ ठरला. पोलिसांनी दिवसभर एका सेक्स वर्करची चौकशी केली आणि नंतर तिला सोडून दिले.
मीरा रोड येथेच राहत असल्याचं कारण सांगत आरोपी कॉन्स्टेबल राजरतन काळे याने महिलेला तिच्या घरी सोडण्याचे आश्वासन दिले, पण त्याऐवजी तो तिला हॉटेलमध्ये घेऊन गेला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, दोघांनी हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण केले, त्यानंतर काळेने तिला एका खोलीत नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला.
अलिकडेच महिलेने ती राहत असलेल्या परिसरातील कनाकिया पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांकडे तिचा जबाब नोंदवला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तिने एमएचबी पोलिस स्टेशनचे प्रभारी डीसीपी (झोन-11) यांच्याकडे लेखी तक्रार देखील केली आहे.