तीन अल्पवयीन मुलींसमोर अश्लील कृत्य करणाऱ्याला जमावाने मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपीविरोधात शनिवारी गुन्हा दाखल केला.
अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीविरोधात तीन मुलींपैकी एका मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रवी राजेंद्रप्रसाद शर्मा (३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
