भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्‍यू

फुले शाहू आंबेडकर
0
धरणगाव : चोपडा रस्त्यावरील पिंपळे फाट्याजवळ आज दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात  मोटारसायकलीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. 
धरणगाव शहरातील संजयनगर भागातील रहिवाशी असलेले प्रदीप पाटील (वय २३) आणि किशोर पाटील (वय ३१) हे दोघेजण कामानिमित्त चोपडा येथे गेले होते. दुपारी चोपड्याहून परत येत असतांना पिंपळे गावाच्या फाट्याजवळ असलेल्या पेट्रोल पंपाच्या वळणावर त्यांच्या दुचाकीला (क्र. एमएच. १९, सीएच ३८९४) भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात दोघे तरुण मोटरसायकलसह फेकले गेले. हा अपघात इतका भीषण होता की, एकाच्या डोक्याचे तुकडे झाले. तर दुसऱ्याच्या पायाचे तीन तुकडे झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण शहरातील मंडळी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default