खिर्डी (ता. खुलताबाद) येथील किरण कारभारी चव्हाण असे झालेल्या तरुणाचे नाव आहे. शेतात झालेल्या पिकांच्या नुकसानावरुन खिर्डी येथील भास्कर हिरवडे आणि किरण कारभारी चव्हाण यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात होऊन भास्कर याने किरणच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घातला. यात किरण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात कोणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात डोक्यात कुऱ्हाड घालून खून
शुक्रवार, ऑगस्ट २६, २०२२
0
औरंगाबाद : शेतातील पिकात जनावरांनी पिकांचे नुकसान केल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एकाने चक्क डोक्यात कुऱ्हाड मारून तरुणाचा खून केला. सदर घटना औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील खिर्डी येथे उघडकीस आली आहे. यामुळे खेडी परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे
Tags
