भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देण्यासाठी काँग्रेसच्यावतीने ही आजादी गौरव पदयात्रा ठिकठिकाणी करण्यात येत आहे. त्यानुसार आज धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात देखील पदयात्रेचे आयोजन काँग्रेसच्यावतीने करण्यात आले होते, या पदयात्रेमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचबरोबर परिसरातील नागरिक सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले आहे.
धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने साक्रीत आजादी गौरव पदयात्रा
शनिवार, ऑगस्ट १३, २०२२
0
धुळे : देशभरामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना काँग्रेसच्यावतीने देखील आजादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आजादी गौरव पदयात्रा काढण्यात आली
