शिवसेनेच्या कार्यालयामागे सट्ट्याचा अड्डा, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी धक्कादायक प्रकार समोर

फुले शाहू आंबेडकर
0

जळगाव: जळगावच्या शिवसेना संपर्क कार्यालयाच्या मागच्या बाजूला सट्ट्याचा अड्डा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिंदे गटात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माजी शहरप्रमुख शोभा चौधरी यांनीच या प्रकाराला वाचा फोडली. शोभा चौधरी यांनी या सट्टापेढीवर छापा घातला आणि या प्रकाराचा भांडाफोड केला.

ही सट्टापेढी शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाच्या आश्रयाने मागच्याच बाजूला सुरू होती, असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. इथे पोहोचलेल्या एमआयडीसी पोलिसांनी अनिल लक्ष्मण माळी यांच्यासह सट्टापेढीचा मालक जावेद शेख सलीम याच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. या ठिकाणाहून सट्टा खेळण्याच्या साहित्यासह विविध प्रकारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगावमध्ये यायच्या आधीच शिंदे गटात गेलेल्या शिवसेनेच्या महिला आघाडीने या सट्टापेढीचा भांडाफोड केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव आणि मुक्ताईनगरमध्ये जाहीर सभा घेतली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default