कॉलेजला निघाली, पुलावरील पाण्याचा अंदाज आला नाही, तरुणी स्कूटीसह पुराच्या पाण्यात वाहून गेली

फुले शाहू आंबेडकर
0
नाशिक: निफाडसह नाशकात सध्या तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे. याच पुरात एक महिविद्यालयीन तरुणी वाहून गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ११ व्या वर्गात शिकणारी तन्वी विजय गायकवाड या तरुणीचा पुराच्या वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे
निफाड  तालुक्यातील शिवडी येथून रानवड साखर कारखान्याजवळील के. के. वाघ कनिष्ठ महाविद्यालयात ११ वीत शिकणारी तन्वी विजय गायकवाड ही सोमवारी सकाळी विनता नदीच्या पुरात वाहून गेली. यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

तन्वी विजय गायकवाड ही सोमवारी सकाळी काँलेजला जात होती. त्यादरम्यान ती ऊगाव खेडे दरम्यान असलेल्या विनता नदीच्या पुलावरुन जात असतांना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ती स्कूटीसह वाहून गेली. तिचा मृतदेह नदीप्रवाहासोबत वाहत जाऊन संत जनार्दन आश्रमशाळेजवळ सापडला. निफाड येथे उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले. निफाड तालुक्यातील रुई येथील विजय गायकवाड यांची ती कन्या होती. शिक्षणासाठी शिवडी येथे मामांकडे राहून कॉलेजला येणं-जाणं करत होती.
नाशकात मुसळधार पाऊस

निफाडसह नाशिक , लासलगाव तालुक्यात काल दुपारपासून पावसाची कोसळधार सुरु असल्याने नदी, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर आला आहे. तर अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत.
अंगावर भिंत पडून एकाचा मृत्यू

चांदवड तालुक्यातील पिंपळद गावात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे घराची भिंत अंगावर पडून दिलीप गणपत माळी (वय-५८) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आशी माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default