मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. ४५ वर्षीय महिला व तिचे जावई हे दोघे त्यांच्या मालकीच्या शेतात पऱ्हाटीच्या पिकाला निंदण करीत होते. दुपारी १.३० वाजेपर्यंत शेतात निंदणीचे काम केल्यावर जावई घरी जेवण करण्यास निघून गेले. पीडित महिला शेतात एकटीच होती. दरम्यान वासनांध पुतण्याने शेतात प्रवेश करुन काकूशी जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. काकूने हटकले असता पुतण्याने बळजबरीने काकूवर अत्याचार केला. घाबरलेल्या काकूने पळ काढून ही बाब तिच्या सासऱ्यांना सांगितली. मात्र, तोपर्यंत आरोपी पुतण्याने तेथून पळ काढला होता.
नात्याला काळीमा फासणारी घटना; पुतण्याने केला काकूवर लैंगिक अत्याचार
गुरुवार, सप्टेंबर १५, २०२२
0
वर्धा जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घडली आहे. वर्ध्यातील दहेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात घडली आहे. शेतात निंदणीचे काम करणाऱ्या काकूवर तिच्याच सख्ख्या पुतण्याने अत्याचार केला आहे. याप्रकरणी दहेगाव पोलिसांनी नराधम पुतण्यास अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे
Tags
