याप्रकरणी पोलिसांनी कारसह चालकाला ताब्यात घेतलं आहे. प्राप्त माहितीनुसार, देवखोप झरी पाडा येथे ४ वर्षीय दक्ष दीपक गोवारी हा चिमुकला अंगणात खेळत होता. त्याचवेळी नंदोर येथून आबाचा पाडाच्या दिशेने जाणारी भरधाव कार जात होती. भरधाव वेगात जाणाऱ्या या कारने दक्षला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की कारने दक्षला दूर फरफटत नेले. या भंयकर घटनेत दक्षचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारसह कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. ४ वर्षीय दक्षचा अचानक कार अपघातात मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
