सुरुवातीला इक्बालने मुलाचा हवाला देत त्यांची समजूत घालण्यास सुरुवात केली. मात्र रुपाली घटस्फोटाच्या मुद्द्यावर ठाम असताना इक्बालने रुपालीला रस्त्यावर ओढले. त्यानंतर चाकूने गळा चिरला, त्यामुळे रुपालीचा जागीच मृत्यू झाला. रुपालीचा आरडाओरडा ऐकून लोक तेथे जमा होऊ लागले. लोकांना पाहताच इक्बालने तेथून पळ काढला.
लोकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रुपालीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध सुरू केला आणि काही वेळातच त्याला अटक केली.
पोलीस चौकशीत इक्बालने सांगितले की, हा त्याचा दुसरा विवाह होता. यापूर्वीही त्याचे लग्न झाले होते. पण पहिल्या पत्नीपासून त्याला मूल होत नसल्याने इक्बालने तिला घटस्फोट दिला. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी त्याने रुपाली चंदनशिवेसोबत लग्न केले. रुपाली आणि तिचा मुलगा इक्बालसोबत राहत होते. मात्र रुपाली काही दिवसांपूर्वी त्याच्यापासून वेगळे राहू लागली. सोमवारी भांडणानंतर तो चिडला आणि त्याने रुपालीचा चाकूने गळा चिरून खून केला.
देशभरात वारंवार लव्ह जिहादच्या घटना समोर येत असल्याने महाराष्ट्रातही याचा प्रसार होतोय का अशी चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांवरुन लव्ह जिहादबाबतही महाराष्ट्रात चर्चा सुरु झालीय. काही दिवसांपूर्वी अमरावतीचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी लव्ह जिहाद असल्याचा दावा केला होता. धारणी येथे राहणाऱ्या एका हिंदू तरुणीला मुस्लिम तरुणाने पळवून नेले आणि अमरावतीत आणले. जिथे तिचा चंद्रविला ट्रस्टमध्ये विवाह झाला. या प्रमाणपत्रावर काजीने सही केल्याची माहिती समोर आली. यानंतर लव्ह जिहाद अंतर्गत मुस्लिम तरुण तरुणींना टार्गेट करत असल्याचा आरोप खासदार बोंडे यांनी केला होता.
