विवाहीतेवर अत्याचार करुन व्हिडीओ व्हायरलची धमकी

फुले शाहू आंबेडकर
0

भडगाव शहरातील ३० वर्षीय विवाहितेवर अत्याचार  करून अत्याचाराचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव शहरात ३० वर्षीय विवाहिता ही आपल्या पती, आई-वडील व भाऊसह वास्तव्याला आहे. योगेश शिवाजी महाजन याने विवाहितेला त्याच्या दुकानात बोलावून जबरदस्तीने अत्याचार केले. एवढेच नाही तर विवाहितेवर केलेल्या अत्याचाराचे व्हिडीओ देखील काढले.

त्यानंतर व्हिडीओ तुझा पती, आईवडील व भाऊला पाठवून देण्याची धमकी देत गेल्या दोन वर्षांपासून वारंवार अत्याचार केले. तसेच विवाहितेला अश्लिल शिवीगाळ करून धमकी देत होता. 

हा प्रकार विवाहितेला असहाय्य झाल्याने अखेर भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश शिवाजी महाजन वय ४० वर्ष रा. खोलगल्ली भडगाव  याच्या विरोधात भादवि कलम ३७६ (१) (२) ( एम ) ५०४,५०६ माहिती तंञज्ञान अधि. २००८ चे कलम  ६६ ( क) चे पोट कलम  (ग) , ६६ ( ड) चे पोटकलम ( ख) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहेत. या आरोपीला पोलीसांनी आज अटक केली आहे अशी माहिती भडगाव पोलीसांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default