पहिली वेळ नाही की एखाद्या प्रकरणात पोलिसांना दोष दिला जात आहे. पोलीस दलात एखादा अधिकारी जेव्हा मोठा होतो, तेव्हा त्याच्यामागे कितीतरी मेहनत असते, योगदान असतं. नवनीत राणांनी याआधीही पोलिसांवर आक्षेप घेतला होता. पोलिसांच्या बाजूने बोलणारी कोणतीही संघटना नाही. साळवी साहेब त्यादिवशी पोलीस स्टेशनमध्ये बसलेले असताना त्यांच्यासोबत जे काही घडलं, ते योग्य होतं का? आम्ही इतक्या दिवस शांत होतो कारण आजपर्यंत इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कोणी वागलं नव्हतं. मात्र राणा यांचं त्यादिवशीचं वागणं अत्यंत गलिच्छ होतं,' अशा शब्दांत वर्षा भोयर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
पोलिसांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांवर कामाचा प्रचंड तणाव असतो. त्याचा घरातील वातावरणावरही परिणाम होतो. मुलं आपल्या अडीअडचणी वडिलांसोबत शेअर करू शकत नाहीत. त्यामुळे पोलीस पत्नीलाच मुलाचे आई आणि बाबा दोन्ही व्हावं लागतं,' असंही भोयर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अमरावतीच्या पोलीस अधीक्षक आरती सिंह यांच्यासोबत सुरू असलेल्या संघर्षावरूनही वर्षा भोयर यांनी नवनीत राणांना खोचक सवाल विचारला आहे. 'आरती सिंह यांना मी कधी भेटलेली नाही. मात्र त्यांनी करोना काळात मालेगावसारख्या शहरात खूप चांगलं काम केलं आहे. अशा महिला पोलीस अधिकाऱ्याला त्रास दिला जात आहे. आरती सिंह यांच्यासोबत तुमचा असा काय वैयक्तिक वाद झाला आहे की तुम्ही त्यांना पूर्णपणे बदनाम करत आहात?' असा सवाल भोयर यांनी केला आहे.