राज्यातील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

फुले शाहू आंबेडकर
0

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण १८ जिल्ह्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंतायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे...

या निवडणुकीत सरपंचाची निवडणूक ही थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १४ ऑक्टोबर २०२२ रोजी मतमोजणी  होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त  यू. पी. एस. मदान  यांनी दिली.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तहसीलदार १३ सप्टेंबर २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २१ ते २७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे २४ व २५ सप्टेंबर २०२२ रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.

नामनिर्देशनपत्रांची छाननी २८ सप्टेंबर २०२२ होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. तर मतदान १३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. तसेच मतमोजणी १४ ऑक्टोबर २०२२ रोजी होईल. याशिवाय नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तर समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या

नाशिक - इगतपुरी ५, सुरगाणा ६१, त्र्यंबकेश्वर ५७, पेठ ७१

नंदुरबार - अक्कलकुवा ४५, अक्राणी २५, तळोदा ५५, नवापूर ८१

पालघर - डहाणू ६२, विक्रमगड ३६, जव्हार ४७, वसई ११, मोखाडा २२, पालघर ८३, तलासरी ११ वाडा ७०

ठाणे - कल्याण ७, अंबरनाथ १, ठाणे ५, भिवंडी ३१, मुरबाड ३५, शहापूर ७९

रायगड - अलिबाग ३, कर्जत २, खालापूर ४, पनवेल १, पेण १, पोलादपूर ४, महाड १, माणगाव ३, श्रीवर्धन १

रत्नागिरी - मंडणगड २, दापोली ४, खेड ७, चिपळूण १, गुहागर ५, संगमेश्वर ३, रत्नागिरी ४, लांजा १५, राजापूर १०

सिंधुदुर्ग - दोडामार्ग २, देवडगड २

पुणे - मुळशी १, मावळ १

सातारा - जावळी ५, पाटण ५, महाबळेश्वर ६,

कोल्हापूर - भुदरगड १, राधानगरी १, आजरा १, चंदगड १

अमरावती - चिखलदरा १

वाशीम - वाशीम १

नागपूर - रामटेक ३, भिवापूर ६, कुही ८

वर्धा - वर्धा २, आर्वी ७

चंद्रपूर - भद्रवाती २, चिमूर ४, मूल ३, जिवती २९, कोरपणा २५, राजुरा ३० व ब्रह्मपुरी १

भंडारा - तुमसर १, भंडारा १६, पवणी २, साकोली १

गोंदिया - देवरी १, गोरेगाव १, गोंदिया १, सडक अर्जुनी १, अर्जुनी मोर २

गडचिरोली - चामोर्शी २, आहेरी २, धानोरा ६, भामरागड ४, देसाईगंज २, आरमोरी २, एटापल्ली २, गडचिरोली १

एकूण- १,१६६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default